अकोला : जिल्हा परिषद नगर खडकी बु.येथे छत्रपती शिवाजी महाराज सभागृह मध्ये प्रजासत्ताक दिन सालाबाद प्रमाणे याहीवर्षी मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला यावेळी सर्वप्रथम छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याचे पूजन व हारार्पण ज्येष्ठ नागरिक वाघ साहेब, ज्येष्ठ नागरिक संघाचे सचिव रंगारी साहेब, देशमुख अक्का, सुधाकर पोलकर, अनिल हरणे मा. ग्रामपंचायत सदस्य यांच्या शुभहस्ते करण्यात आले. तर ध्वजारोहण ज्येष्ठ नागरिक वाघ साहेब यांच्या शुभहस्ते करण्यात आले. यावेळी माजी शिक्षणाधिकारी वाणी साहेब यांनी प्रजासत्ता दिनाबाबत सविस्तर असे मार्गदर्शन केले. यावेळी मा. ग्रामपंचायत सदस्य श्रीअनिल ओंकार हरणे यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांचे शेळके ताई, देशमुख काका यांनी ओशवंत करून त्यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा दिल्या तसेच उपस्थित जिल्हा परिषद नगर परिवारातर्फे अनिल हरणे यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा देण्यात आल्या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आयोजक ज्येष्ठ समाजसेवक गजानन हरणे यांनी केले तर आभार प्रदर्शन देशमुख आका यांनी केले या कार्यक्रमाला जिल्हा परिषद नगर येथील ज्येष्ठ नागरिक महिला युवक मोठ्या संख्येने उपस्थित होते कार्यक्रम शांततेत परंतु उत्सवात पार पडला.
Post Views: 230
सर्व
सर्व
admin@sanjay
admin@Sanjay