प्रज्ञा सिंह ठाकूर यांना कोरोना; काँग्रेस म्हणते तुम्ही तो उपाय केला नाही का?


 संजय देशमुख  31 Jan 2022, 5:14 PM
   

मध्य प्रदेश : भाजप खासदार साध्वी प्रज्ञा सिंह ठाकूर  यांना कोरोनाची लागण  झाली आहे. याची माहिती त्यांनी ट्विट करून दिली. सोबतच त्यांनी आपल्या संपर्कात आलेल्या लोकांनाही कोरोना चाचणी करून घेण्याचे आवाहन केले आहे. याचवेळी त्यांची खरडपट्टी काढायला काँग्रेस चुकली नाही. मध्य प्रदेश काँग्रेसचे प्रवक्ते नरेंद्र सलुजा यांनी ट्विट करून विचारले की, त्यांनी स्वतः सांगितलेले उपाय करून पाहिले नाहीत का?
मध्य प्रदेशातील भाजप खासदार साध्वी प्रज्ञा सिंह ठाकूर यांनी ट्विट करून स्वतःला कोरोनाची लागण झाल्याची माहिती दिली. त्यांनी लिहिले की, आज माझा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. मी डॉक्टरांच्या देखरेखीखाली आहे. दोन दिवसांत माझ्या संपर्कात आलेल्या सर्वांनी सतर्क राहावे आणि गरज पडल्यास कोरोना चाचणी करून घ्यावी, असे आवाहन त्यांनी ट्विटद्वारे केली

    Post Views:  273


मुख्य संपादक
संजय एम. देशमुख




सहसंपादक
सतिश एम.देशमुख