राऊतांची नजर मुख्यमंत्र्यांच्या खुर्चीवर; नारायण राणेंचा पत्रकार परिषदेत हल्लाबोल


भाजप-शिवसेनेमध्ये आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी
 संजय देशमुख  16 Feb 2022, 7:59 PM
   

मुंबई : संजय राऊत यांची नजर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या खुर्चीवर आहे. संजय राऊत शिवसेनेचे नाही तर शिवसेना संपवण्यासाठी राष्ट्रवादीची सुपारी घेतली आहे, असे म्हणत केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी शिवसेना खासदार संजय राऊत यांच्यावर हल्लाबोल केला आहे. तसेच 15 फेब्रुवारीला आंतरराष्ट्रीय परिषदेला उत्तर देण्यासाठी आजची पत्रकार परिषद घेतली आहे, असा टोला देखील नारायण राणेंना संजय  राऊत यांना या वेळी दिला आहे. महाराष्ट्राच्या इतिहासातील सर्वात लाचार मुख्यमंत्री सध्याचा आहे. शरद पवार, काँग्रेसवर टीका केली आणि आज त्यांच्यासोबत सत्तेसाठी बसले आहे, अशी टीका नारायण राणेंनी उद्धव ठाकरेंवर केली आहे. 
स्वत: शिवसेनाप्रमुख असलेल्या अविर्भावात संजय राऊत यांनी पत्रकार परिषद घेतली. पत्रकार परिषदेत राऊतांनी वापरलेले शब्द एखाद्या वृत्तपत्राच्या संपादकाला शोभणारे  नव्हते. पत्रकाराला ही शोभणारी भाषा नव्हती. राऊतांनी पत्रकार परिषदेत बेताल आरोप केले आहे. प्रवीण राऊत याने ईडीला दिलेल्या मुलाखतीनंतर राऊत घाबरले आहेत. भाजपवर आरोप केले, परंतु कोणेतेही पुरावे दिलेले नाही. मी कोणाला घाबरत नाही. जो घाबरतो तो वारंवार म्हणतो मी घाबरत नाही. शिवसेना भवनात पत्रकार परिषद घेतली, परंतु त्या पत्रकार परिषदेला कोणीही नाही. पत्रकार परिषदेला फक्त नाशिकचे लोक होते. शिवसेनेसाठी पत्रकार परिषद घेतली की स्वत:साठी घेतली हा सवालच आहे. संजय राऊत यांची कुंडली माझ्याकडे आहे. वेळ आल्यावर मी ती बाहेर काढेन, असा इशारा नारायण राणेंनी संजय राऊत यांना दिला आहे. बाळासाहेबांचे आशीर्वाद आहे असे म्हणणारे संजय राऊत शिवसेनेत 1992 मध्ये आला. संजय राऊत यांचा तोल गेला असून, त्यांना वैद्यकीय उपचाराची गरज आहे. तसेच संजय राऊतांनी पत्रकार परिषद घेणे थांबवावे आणि जे ओढावले आहे, त्याला सामोरे जावे असा सल्ला नारायण राणेंने संजय राऊत यांना दिला आहे.
राऊत शिवसेना संपवतील : चंद्रकांत पाटील
शरद पवारांच्या पेरोलवर राहून संजय राऊत शिवसेना संपवत असल्याचा आरोप भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटलांनी केला आहे. मोहित कंबोज देवेंद्र फडणवीस यांना घेऊन नाही तर संजय राऊत हे उद्धव ठाकरे यांना घेऊन डुबतील, अशी टीका चंद्रकांत पाटील यांनी केली आहे.
संजय राऊत हे शिवसेना संपवत आहेत हे उद्धव ठाकरे यांच्या लक्षात कधी येणार असा प्रश्न देखील चंद्रकांत पाटलांनी उपस्थित केला. सत्ता स्थापनेच्या वेळी कुणी कुणाला भरीस पाडले हे संपूर्ण राज्याला माहिती आहे. या सत्तेचा उपभोग केवळ राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष घेत आहे. छोटे घटक पक्ष सोडा, पण काँग्रेस आणि शिवसेनेमधील मोठा गट देखील नाराज असल्याचे या वेळी चंद्रकांत पाटील यांनी बोलून दाखवले. संजय राऊत तुम्ही कुणाला धमकी देत आहात. आता त्या काळाला भाजप राहिला नाही. अ‍ॅक्शनला रिअ‍ॅक्शन येणार हे लक्षात घ्या. दोषी असतील ते जेलमध्ये जातील, भले ते भाजपचे असले तरी, ज्यांनी चुकी केली ते शिक्षा भोगतील. मात्र गल्लीतल्या दोन मंडळासारखी कसली भाषा करताय. तब्येत बरी असेल तर सांगण्याची आवश्यकता नसते, मात्र तब्येत बरी नसली की मला काही झाले नाही हे वारंवार सांगावे लागते. यंत्रणेवर दोष देता म्हणजे तुम्ही घटनेवर दोष देत आहात, असा आरोप पाटील यांनी केला.
सोमय्यांनी शेकडो कोटी गोळा केले : संजय राऊत
मुंबईतील बिल्डर, व्यापारी यांच्याकडून ईडीच्या नावाने धमक्या देऊन या किरीट सोमय्याने आतापर्यंत शेकडो कोटी जमा केले आहेत. 8 जेव्हीपीडी स्कीम, सुजीत नवाब नावाचा एक प्लॉट आहे. तो प्लॉट किरीट सोमय्या आणि त्याचा मित्र अमित देसाई बिल्डर या दोघांनी मूळ मालकाला ईडीची धमकी देऊन 100 कोटी रुपयांचा प्लॉट त्याहूनही अधिक जास्त किमतीचा प्लॉट मातीमोल भावाने अमित देसाईंच्या नावाने करून घेतला. ईडीची धमकी देऊन हा प्लॉट आपल्या नावे करून घेतला आहे आणि त्यातले पंधरा कोटी रुपये किरीट सोमय्या यांनी कोणत्या ईडी अधिकार्‍याला नेऊन दिले हे स्पष्ट करावे नाहीतर मी त्या अधिकार्‍याचे नाव घेईल, असेही संजय राऊत म्हणाले.

    Post Views:  224


मुख्य संपादक
संजय एम. देशमुख




सहसंपादक
सतिश एम.देशमुख


सबंधित बातम्या

सर्व