खाजगी रुग्णालयांमध्ये रुग्णांची बेसुमार लुट त्वरित थांबवा! : गजानन हरणे
विश्वप्रभात न्यूज ब्युरो
25 Feb 2022, 12:36 PM
अकोला : अकोला जिल्ह्यातील खाजगी रुग्णालयांमध्ये रुणाची बेसुमार लुट सुरु असून ही लुट त्वरीत थांबली नाही तर मोठे जनआंदोलन छेडण्याचा निर्भीड इशारा गजानन हरणे ज्येष्ठ समाजसेवक तथा संयोजक निर्भय बनो जनआंदोलन, अकोला यांनी मुख्यमंत्र्यांना पाठवलेल्या निवेदना द्वारे दिला आहे. या सर्वसामान्यांशी निगडीत व गंभीर प्रश्नाला वाचा फोडन्यासाठी या निवेदनात म्हटले आहे की, मानवी जीवनात आरोग्याला फार महत्व आहे. सार्वजनिक आरोग्यासाठी शासकीय यंत्रणा असूनसुध्दा तिचा फारसा उपयोग होत नाही. जवळपास सर्व प्रकारच्या शस्त्रक्रिया आणि चाचण्या या शासकीय रुग्णालयांमध्ये करण्याची सुविधा उपलब्ध आहे. मात्र तिथला डॉक्टर वर्ग आणि कर्मचाऱ्यांच्या आशीर्वादाने कोणत्याही शारीरिक चाचण्या करण्यासाठी खाजगी रुग्णालयात किंवा लॅबमध्ये जावे लागते. त्यावेळी खाजगी सणालयात सर्वसामान्य जनतेची बेसुमार लुट केली जाते. दरोडे टाकण्याच्या या सफेदपोश प्रकाराला आळा घालण्यासाठी ग्राहक हक्क नॅशनल ॲक्रीडेशन (एनएबीएच) नुसार प्रत्येक खाजगी रुग्णालयात तसेच रक्तचाचण्या लॅबमध्ये शासनाने ठरवून दिलेल्या दरानुसार दर्शनिय भागात दरपत्रक लावणे बंधनकारक असून सुदा कोणत्याही खाजगी रुग्णालयात दरपत्रक न लावल्यामुळे रुग्णांची बेसुमार लुट सुरु आहे. तरी त्वरीत सर्व रुग्णालयांमध्ये दरपत्रक लावण्यात यावे. अन्यथा निर्भय बनो जनआंदोलन अकोला यांच्या वतीने मोठे जनआंदोलन छेडण्याचा इशारा ज्येष्ठ समाजसेवक गजानन हरणे यांनी निवेदनाद्वारे दिला आहे.
आरोग्य क्षेत्रात सर्वसामान्यांची खरोखरच आर्थिक पिळवणूक होते. रुग्णांच्या हक्कांसंदर्भात कायदा असला तरी अनेक वेळा हक्क काय आहेत याची माहितीच रुग्णांच्या हक्कांबाबत प्रत्येक रुग्णालयात दर्शनी भागात माहिती फलक लावणे बंधनकारक असते. नॅशनल अॅक्रिडेशन (एनएबीएच) मिळविण्यासाठी प्रत्येक रुग्णालयाला हे बंधनकारक असले तरी या हक्कांची लोकांना मात्र कल्पना नसते. आपले हक्क मिळविण्यासाठी लोकांमध्ये जनजागृती करण्याची आवश्यकता आहे. सध्या आपल्या देशात एकूण उत्पन्नाच्या किमान ९% खर्च आरोग्य सेवेवर होणे गरजेचे असतांना तेवढा तो केला जात नाही. त्यामुळे सार्वजनिक आरोग्य व्यवस्था कमकुवत असल्याचा फायदा खाजगी आरोग्य सेवा उचलते. त्यामुळे प्रत्येक डॉक्टर आपल्या मनाप्रमाणे रुगनाकडून फी वसुल करतो. यावर नियंत्रणासाठी सरकारला ठोस कारवाई करावी लागेल, असे वास्तव निर्भय बनो जनआंदोलनाच्या वतीने गजानन हरणे यांनी या निवेदनाद्वारे महाराष्ट्र शासनाच्या निदर्शनास आणून दिले आहे. तरी या सर्वसामान्य गोरगरीब जनतेची होणारी लूट थांबविण्यासाठी या खाजगी रुग्णालयांनवर त्वरित कारवाई करण्यात यावी व त्यांना त्यांच्या दवाखान्यामध्ये दरपत्रक लावण्यासाठी ,तसेच प्रत्येक डॉक्टर ने या सर्व गोष्टीचे बिले देण्याविषयी बंधनकारक करावे अशी मागणी निर्भय बनो जनआंदोलनाच्या वतीने संयोजक गजानन हरणे यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे. तरी या बाबीची त्वरित शासनाने दखल घ्यावी अन्यथा जनआंदोलन केल्या जाण्याचा इशारा देण्यात आला आहे..
Post Views: 340