मुंडगावकर ज्वेलर्सचे दोन्ही प्रमुख संचालकांना अटक
१४.८५ कोटीने पसवणूक; अमरावती रेल्वेस्थानका वरून अटक
विश्वप्रभात न्यूज ब्युरो
02 Mar 2022, 9:18 PM
अकोला : सराफा व्यावसायिक मुंडगावकर ज्वेलर्सकडून गुंतवणुकदारांच्या झालेल्या आर्थिक फसवणूक प्रकरणातील फरार मुख्य दोन्ही आरोपी गुन्हा दाखल झाल्यानंतर तब्बल महिनाभरांनी पोलिसांच्या जाळ्यात अडकले आहे. या गुन्हात फरार असलेले अमोल विजय मुंडगांवकर, वय ४२ वर्षे, उदय विजय मुंडगांवकर, वय ४० वर्षे यांना अमरावती रेल्वे स्थानकावरून अटक केली.
शहरातील न्यू मुंडगांवकर ज्वेलर्स, श्री मुंडगांवकर ज्वेलर्स, मुंडगांवकर ज्वेलर्स या प्रतिष्ठानमध्ये रोख रक्कम व सोन्याची गुंतवणूक केल्यास त्यावर आकर्षक व्याज दर देण्याचे आमिष दाखवून त्यांच्याकडून गुंतवणुक स्वीकारत फसवणूक केल्याने सिटी कोतवाली पोलिस स्टेशनमध्ये मुंडगावकर ज्वेलर्सच्या संचालकांकडून फसवणूक झाल्याची तक्रार दाखल झाल्यानंतर सर्व संचालकांविरोधात गुन्हा झाला होता. त्यात अमोल विजय मुंडगांवकर, उदय विजय मुंडगांवकर, विजय ओंकार मुंडगांवकर, सविता अमोल मुंडगांवकर, किरण उदय मुंडगांवकर, सर्व रा. लक्ष्मीनगर, गौरक्षण रोड, मंगलसिंग गंगासिंग ठाकुर, मुनिम रा.गीता नगर आदी आरोपींचा समावेश होता. आतापर्यंत एकूण ३७८ गुंतवणुकदारांची १४ कोटी ७५ लाख रुपये एवढी फसवणूक झाल्याचे उघडकीस आले आहे. आर्थिक गुन्हे शाखेचे प्रमुख पोलिस निरीक्षक विजय नाफडे हे प्रकरणाचा तपास करीत असून यापूर्वी विजय मुंडगावकर व सविता अमोल मुंडगावकर आणि मंगलसिंग चंदेल उर्फ राजू ठाकूर यांना पोलिसांनी अटक केली होती. आता आर्थिक गुन्हे शाखा व स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी फरार असलेले अमोल विजय मुंडगांवकर, वय ४२ वर्षे, उदय विजय मुंडगांवकर, वय ४० वर्षे यांना अमरावती रेल्वे स्थानकावरून अटक केली.
दोघांना 7 मार्चपर्यंत पोलीस कोठडी
गेल्या अनेक दिवसापासून फरार असलेले वडगावकर ज्वेलर्सचे संचालक अमोल मुळगावकर होऊद्या मुळगावकर यांना पोलिसांनी अमरावती रेल्वे स्टेशन येथून अटक केल्यानंतर न्यायालयात हजर केले न्यायालयाने दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकल्यानंतर आरोपीला सात मार्चपर्यंत पोलीस कोठडी ठोठावली आहे.
Post Views: 213