युक्रेनमध्ये शिकणारे जिल्ह्यातील पाचही विद्यार्थी सुरक्षित ठिकाणी


 विश्वप्रभात न्यूज ब्युरो  2022-03-02
   

अकोला : शिक्षणासाठी युक्रेनमध्ये असलेल्या अकोला जिल्ह्यातील मुळ रहिवासी असलेल्या विद्यार्थ्यांची संख्या पाच आहे व या सर्व विद्यार्थ्यांशी संपर्क झाला असून हे विद्यार्थी सुरक्षित ठिकाणी असल्याचे जिल्हा प्रशासनाने कळविले आहे.

यासंदर्भात जिल्हा प्रशासनाने कळविलेल्या माहितीनुसार, मोहित विजय मालेकर हा विद्यार्थी युक्रेनची सीमा पार करुन सध्या पोलंड येथे भारतीय दुतावासाच्या नियंत्रणात असलेल्या हॉटेलमध्ये मुक्कामी आहे.  हुसेनउल्ला खान हा विद्यार्थी  युक्रेनची सीमा पार करुन  रुमानिया मध्ये भारतीय दुतावासाने निश्चित केलेल्या ठिकाणी मुक्कामी आहे.  प्राप्ती भालेराव ही विद्यार्थिनी युक्रेनची सीमा पार करुन  स्लोहोकिया मध्ये सुरक्षित ठिकाणी असून भारतीय दुतावासाच्या संपर्कात आहे. जॅक निक्सन हा विद्यार्थी युक्रेनची सीमा पार करुन  पोलंडमध्ये सुरक्षित ठिकाणी मुक्कामी आहे. अब्दुस साबुर अहमद हा विद्यार्थी पोलंड येथे सुरक्षित ठिकाणी आहे,असे जिल्हा प्रशासनाने कळविले आहे. या सर्व विद्यार्थ्यांना भारतात परत आणण्यासाठी आवश्यक प्रक्रिया सुरु आहे, असेही प्रशासनाने स्पष्ट केले आहे.

    Post Views:  250


मुख्य संपादक
संजय एम. देशमुख




सहसंपादक
सतिश एम.देशमुख


सबंधित बातम्या

सर्व