सिध्देश्वर देशमुख यांची विदर्भ प्रीमिअर हाऊसिंग सोसायटीमध्ये निवड


 विश्वप्रभात न्यूज ब्युरो  04 Mar 2022, 6:48 PM
   

अकोला : लोकस्वातंत्र्य पत्रकार महासंघ या समाजाभिमुख राष्ट्रीय संघटनेचे विदर्भ विभागीय संघटन व संपर्क प्रमुख   श्री सिध्देश्वर देशमुख यांची विदर्भातील प्रख्यात दि विदर्भ प्रिमिअर को.ऑप. हाऊसिंग सोसायटी ली.च्या अकोला शाखेच्या सल्लागार समितीमध्ये सदस्य म्हणून निवड झाली आहे. संघटनेच्या स्थापनेपासूनच्या एक वर्षात अनेक पदाधिकाऱ्यांना शासन समिती निवड, नियुक्त्या आणि पुरस्कारांचे बहूमान प्राप्त झालेले आहेत.
      नागपूर मुख्यालय असलेल्या व  सन १९३० मध्ये स्थापित झालेल्या सहकारातील या संस्थेची हाऊसिंग, व्यवसायिक क्षेत्रात कोट्यावधिंची फार मोठी उलाढाल असून विदर्भात त्यांच्या  २० जिल्हा शाखा कार्यरत आहेत. यामध्ये अकोल्यात चार जुणे सदस्य कायम असून नव्या कार्यकारिणीत सध्या कायम  सिध्देश्वर देशमुख यांना घेण्यात आले आहे.ते बालपणापासून राष्ट्रीय स्वयंसेवक संघात सक्रिय असून त्यांनी आणिबाणीच्या काळात कारावास सुध्दा भोगलेला आहे.या चळवळीतील सहभागी सेनानींच्या लोकतंत्र सेनानी संघाचे सध्या जिल्हा सचिव व समर्थ शिक्षण प्रसारक मंडळाचे सहसचिव आहेत. शिक्षकेत्तर कर्मचारी संघटनेचे राज्य पदाधिकारी म्हणूनही त्यांनी काम केलेले असून सध्या मार्गदर्शक म्हणून सक्रीय आहेत.त्याचप्रमाणे लोकस्वातंत्र्य पत्रकार महासंघाच्या संघटन कार्य आणि उपक्रमांमध्येही त्यांची महत्वाची भुमिका आहे. त्यांच्या निवडीचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.

    Post Views:  345


मुख्य संपादक
संजय एम. देशमुख




सहसंपादक
सतिश एम.देशमुख


सबंधित बातम्या

सर्व