अखिल भारतीय मराठा महासंघाच्या वतीने रक्तदान शिबिर संपन्न


 विश्वप्रभात न्यूज ब्युरो  25 Mar 2022, 12:54 PM
   

मराठा महासंघाचे संस्थापक अध्यक्ष कै. आमदार अण्णासाहेब पाटील यांचे पुण्यतिथीनिमित्त मराठा महासंघाचे जिल्हाध्यक्ष श्री सुरेश ठाकरे, उपाध्यक्ष श्री प्रशांत देशमुख, युवक अकोला महानगर अध्यक्ष महानगराध्यक्ष श्री प्रतिक देशमुख,कार्याध्यक्ष आदेश अंधारे यांचे नेतृत्वाखाली व विदर्भ प्रदेश उपाध्यक्ष श्री राम मुळे यांचे मार्गदर्शना खाली जिल्हा सामान्य रुग्णालय अकोला येथे रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले सदर शिबिरामध्ये गौरव पांडे नरेंद्र, जाधव ,सुचीत देशमुख ,स्वप्नील महल्ले ,अनिकेत देशमुख, साहिल ठाकूर, प्रतिक देशमुख, ज्ञानेश्वर भारंबे ,अंकुश राऊत, शेखर आडगावकर ,स्वप्नील देशमुख ,मयूर वानखडे, चैतन्य गणविर, तेजस वैराळे,विनायक तायडे, आदित्य भगत, निखिल अंधारे यांनी रक्तदान केले याप्रसंगी जिल्हाध्यक्ष सुरेश ठाकरे, उपाध्यक्ष प्रशांत गावंडे,के.एम. देशमुख, महानगर युवक अध्यक्ष श्री प्रतिक देशमुख , अड. अमोल सूर्यवंशी, आदेश अंधारे आशिष चव्हाण,कु. कल्याणी ठाकरे, योगेश जाधव,राम मुळे  आदी पदाधिकारी व कार्यकर्ते प्रामुख्याने उपस्थित होते. कार्यक्रमाच्या सुरुवातीला मराठा महासंघाचे संस्थापक कै.आमदार अण्णासाहेब पाटील यांच्या प्रतिमेचे पूजन करून  पुष्पहार अर्पण करण्यात आला. व रक्तदान करून के. अण्णासाहेब पाटील यांना अभिवादन करण्यात आले.

    Post Views:  269


मुख्य संपादक
संजय एम. देशमुख




सहसंपादक
सतिश एम.देशमुख


सबंधित बातम्या

सर्व