अकोला - परिवहन विभागाच्या निर्देशानुसार शासकीय विभागात येणाऱ्या दुचाकीस्वारांना हेल्मेट परिधान करणे आवश्यक आहे. त्यानुसार, विना हेल्मेट येणाऱ्या दुचाकीस्वारांची तपासणी करुन विशेष मोहिमेअंतर्गत कारवाई करण्यात येत आहे. त्यात बुधवारी(दि.30) जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात 61 वाहनधारकांवर, गुरुवारी (दि.31) महानगरपालिका परिसरात 57 जणांवर तर जिल्हा परिषद इमारतीच्या आवारात 58 जणांवर अशा एकूण 176 विना हेल्मेट येणाऱ्या दुचाकीस्वारांकडून दंड वसूल करण्यात आला, अशी माहिती उपप्रादेशिक परिवहन अधिकारी जयश्री दुतोंडे यांनी दिली.
वाहन चालवितांना हेल्मेटचा वापर करणे हे रस्ता सुरक्षेच्या दृष्टीकोनातून अत्यंत महत्वाचे आहे. दुचाकी वाहनांच्या अपघातामध्ये जखमी किंवा मृत पावणारे वाहनस्वार हे विना हेल्मेट प्रवास करणारे असतात. हेल्मेट वापरासंबंधीत प्रबोधनात्मक व अंमलबजावणी व्हावी याकरीता तपासणी मोहिमेची सुरुवात करण्यात आली. ही मोहिम जिल्हाभर राबविण्यात येणार आहे. ही मोहिम उप प्रादेशिक परिवहन अधिकारी जयश्री दुतोंडे यांच्या मार्गदर्शनाखाली राबविण्यात येत आहे. उप प्रादेशिक परिवहन कार्यालयातील पथक क्रमांक 1 मध्ये मोटार वाहन निरीक्षक अभिजीत टाले, सहायक मोटार वाहन निरीक्षक नितीन खरात, गोपाल पंचाली व कृष्णा नेवरे यांनी व पथक क्रमांक 2 मध्ये मोटार वाहन निरीक्षक संदिप तुरकणे, सहायक मोटार वाहन निरीक्षक मनोज शेळके, भागवत चोपडे, दिनेश एकडे, वाहन चालक गौतम अरखराव व मोहम्मद अतहर यांनी संयुक्तपणे ही तपासणी मोहिम राबविली.
Post Views: 256
सर्व
सर्व
admin@sanjay
admin@Sanjay