श्रीरामजन्मोत्सवात पंचकुंडी महायज्ञ व नवरात्र पूर्णाहूती


 विश्वाप्रभात न्यूज ब्युरो  2022-04-13
   

अकोला : अखिल विश्व गायत्री परिवार शांतिकुंज हरिद्वार च्या तत्वावधानात पंचकुंडीय गायत्री महायज्ञ, चैत्र नवरात्री पूर्णाहुती, श्रीराम जन्मोत्सव मोठी उमरी हनुमंत नगर अकोला येथे उत्साहाने संपन्न झाले गायत्री महायज्ञ संचालन डॉ अजय उपाध्याय, डॉ सुरेश राठी, प्राचार्य किसन मोरे पाटील यांनी केले गोरीबाई यांनी ढपलीवर सुंदर प्रज्ञा गीत प्रस्तुत केले गायत्री परिवार द्वारे घरो घरी गायत्री, यज्ञ, संस्कार कार्य निःशुल्क अभियान विश्व स्तरावर सुरू आहे. या माध्यमातून  जनमाणसापर्यंत  यज्ञमय जीवन सद्सद् विवेक द्वारे कसे जगता येते , पर्यावरण संवर्धन मध्ये आपले योगदान, समाजातील वाईट चाली रीती, रुढी परंपरा, व्यसन, धन, साधन, अन्न, वेळ ची कुरीती मध्ये होत असलेली नासाडी कशी रोखता येते याबद्दल सखोल मार्गदर्शन व महायज्ञ पूर्णाहुतीत हात वर करून एक वाईट गुण सोडवायचे व एक चांगले गुण धारण करावयाचे संकल्प करण्यात आले गायत्री परिवार अकोला चे अतिजेष्ठ साहित्य प्रचारक श्री गोविंदराव रायलकर यांचा पंच्याहत्तरावा 75 वा जन्मदिवसोत्सव यज्ञमय वातावरणात संपन्न झाला सर्वांनी पुष्पवृष्टी करून हार्दिक शुभेच्छा दिल्या श्री गोविंदराव रायलकर या वयातही आपल्या मोपेड छोटी गाडी द्वारे अकोला जिल्यात एका फोन कॉल वर  गायत्री साहित्य घरपोच सेवा देतात कार्यक्रम सफलते साठी अकोला गायत्री परिवार, श्री रायलकर परिवार, हनुमंत नगर मोठी उमरी वासी यांनी परिश्रम घेतले सांगता महाप्रसादा ने झाली.

    Post Views:  244


मुख्य संपादक
संजय एम. देशमुख




सहसंपादक
सतिश एम.देशमुख


सबंधित बातम्या

सर्व