नगर, दि. २५ नोव्हेंबर : तालुक्यातील जामखेड रोडवरील चिचोंडी पाटील येथे एक धक्कादायक घटना घडली आहे. सून व सासरा यांच्यात चारित्र्यच्या संशयावरून वाद झाला. या वादामध्ये सुनेने सासऱ्याला लोखंडी कुऱ्हाड आणि दगडाने मारहाण केली आहे. याच मारहाणीमध्ये सासऱ्याचा मृत्यू झालाय.
मिळालेल्या माहितीनुसार ६३ वर्षीय अर्जुन हजारे असं मरण पवालेल्या व्यक्तीचं नाव आहे. तर या प्रकरणामधील आरोपी महिलेचं नाव ज्योती हजार असं आहे. पोलिसांनी आरोपी महिलेला अटक केली असून तिच्याविरोधात खूनाचा गुन्हा दाखल करण्यात आलाय. या प्रकरणाची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली असता अर्जुन हे रक्ताच्या थारोळ्यात पडलेले आढळून आले. सदर गुन्हामध्ये आरोपी महिलेला अटक केली असून पुढील तपास चालू आहे, अशी माहिती सहाय्यक पोलिस निरीक्षक युवराज चव्हाण यांनी दिली आहे.
Post Views: 274