सौंदर्य मनाचे


 विश्वप्रभात न्यूज ब्युरो  23 May 2022, 12:41 PM
   

सौंदर्य मनाचे असावे
वैर्यालाही लाजवीत जावे
मनाच्या मोगऱ्याचा सुगंधाने
मनामनाला मोहित करावे.....१

    निर्मळ मनाची भावना
    खुलवतो साज तनूचा
    नात्यांच्या प्रेमाचा गोडवा
    भासे जणू  गुलकंद मायेचा....२

विश्वात अनमोल सौंदर्य मनाचे
 चांदणीची साथ जशी चंद्राला
सुखाचा प्राजक्त बहर प्रीतीचा
आधार ,ओढ वाटे जीवनाला....३

    ओढ असावी नात्याला
    शब्दांचे माधुर्य नित्य जपावे
    अंतरंगातील भावनांचे
    विवेकाने मनमीत मांडावे....४

कटुता,इर्षा,द्वेष,स्वार्थाला
थारा नसावा हृदयात
प्रीतफुल,हर्षमोती माळ
गुंफून वेणी माळावी कुंतलात....५

सुखदुःखाच्या प्रसंगात
द्यावा हसतमुखाने आधार
नात्यांचे औचित्य  संगतीने
हृदयसौंदर्य हाच साज शृंगार....६

अनिता देशमुख, नांदुरा(बुलढाणा)
ह.मू. कल्याण

    Post Views:  266


मुख्य संपादक
संजय एम. देशमुख




सहसंपादक
सतिश एम.देशमुख


सबंधित बातम्या

सर्व