एल. आर. टी. च्या कॅडेट ऋषिकेश पटेल ने दिल्ली मध्ये केले अकोला जिल्ह्याचे प्रतिनिधित्व
विश्वप्रभात न्यूज ब्युरो
27 Aug 2022, 5:03 PM
नवी दिल्ली येथील लाल किल्ल्यावर दि.१५ ऑगस्ट रोजी "आजादी का अमृत महोत्सव" निमित्ताने राष्ट्रीय छात्र सेना विभागाच्या वतीने "एक भारत श्रेष्ठ भारत" इंडिपेंडन्स डे कॅम्प २०२२ राबवण्यात आला होता. दिल्ली येथे लाल किल्यावर झालेल्या अमृत महोत्सवी कार्यक्रमास १७ देशातील एन.सी.सी. कॅडेट चे पथसंचलन करण्यात आले होते. त्या पथ संचालनात अकोला जिल्ह्याचे प्रतिनिधित्व म्हणून श्रीमती एल. आर. टी. कॉलेज ऑफ कॉमर्स, अकोला च्या एन.सी.सी. विभागाचा कॅडेट ऋषिकेश पटेल यांची निवड करण्यात आली होती. भारतातील प्रत्येक राज्यामधून या कॅम्पसाठी कॅडेटची निवड करण्यात आली होती. महाराष्ट्र राज्यामधून सुद्धा ३६ कॅसेट्सची निवड करण्यात आली. त्यामध्ये अकोला जिल्ह्यातील श्रीमती एल. आर. टी. वाणिज्य महाविद्यालयाचा विद्यार्थी कॅडेट ऋषिकेश पटेल याची निवड झाली होती. "एक भारत श्रेष्ठ भारत" हा कॅम्प दि. ०१ ते १६ ऑगस्ट या दरम्यान आयोजित करण्यात आल होता. १५ ऑगस्ट रोजी लाल किल्ल्यावर संपन्न झालेल्या कार्यक्रमात विविध देशातील राष्ट्रीय छात्र सेनेच्या कॅडेट्सनी भारतातील विविध सांस्कृतिक परंपरा आणि पद्धतीची ओळख सांस्कृतिक उत्सवाच्या माध्यमातून करून दिली. या कॅम्प मध्ये त्यांना माननीय पंतप्रधान श्री. नरेंद्र मोदी आणि डि. जी. एन. सी. सी. लेफ्टनंट जनरल गुरुबीरपाल सिंह यांच्या सोबत संवाद साधन्याची संधी प्राप्त झाली. ११ महाराष्ट्र बटालियन अकोला चे कमांडिंग ऑफिसर कर्नल बिजॉय चौधरी व लेफ्टनंट कर्नल चंद्रप्रकाश भदोला तसेच एल.आर .टि. कॉलेज ऑफ कॉमर्स अकोलाचे प्राचार्य एस. जी.चापके आणि कैप्टन डॉ अनिल तिरकर यांनी कॅडेट ऋषिकेश चा सत्कार करून त्याचे अभिनंदन केले. या कॅम्प दरम्यान ऋषिकेश ला दोन बॅच तसेच गोल्डन सार्जंट रँक ने सन्मानित करण्यात आले. कॅडेट ऋषिकेश पटेल त्याच्या कामगिरीबद्दल दि. बी. जी. ई. सोसायटीचे अध्यक्ष ॲड. मोतीसिंहजी मोहता, वरिष्ठ उपाध्यक्ष श्री. विजयकुमारजी तोष्णीवाल, कनिष्ठ उपाध्यक्ष श्री. रवींद्रजी जैन, मानद सचिव श्री. पवनजी माहेश्वरी, सहाय्यक सचिव इंजि. अभिजित परांजपे व समस्त माननीय कार्यकारी सदस्यांनी त्याचे अभिनंदन केले व त्याला पुढील वाचालीसाठी शुभेच्छा दिल्यात.
Post Views: 232