शिधा‎ किट वाटप: वानखेड ग्रामस्थांना आनंदाचा शिधा‎ किट वाटप, योजनांचीही दिली माहिती‎


 विश्वप्रभात न्यूज ब्युरो  09 Nov 2022, 5:49 PM
   

(स्वप्निल देशमुख) संग्रामपुर :- तालुक्यातील वानखेड येथे समस्त‎ शिधा पत्रिका धारकांना आनंदाचा शिधा शुक्रवारी (ता.7 नोव्हेंबर) सकाळी वाटप करण्यात आला. तसेच‎ शासनाच्या विविध योजनांची माहिती देण्यात आली.
यावर्षी महाराष्ट्र सरकारने केवळ शंभर रुपयात गोडतेल,‎ रवा, साखर व चनाडाळ असे प्रत्येकी एक-एक किलो‎ साहित्य आनंदाचा शिदा या किटद्वारे उपलब्ध केला‎ असून, वानखेड येथील राशन दुकानदार श्री नाना कथले यांनी सोमवार सकाळी सर्व ग्रामस्थांना या किटचे वाटप‎ केले. सर्व ग्राहकांनी या सुविधेचा लाभ मिळाल्याने‎ आनंद व्यक्त केला. गावातील एक ही पात्र लाभार्थी या‎ योजनेपासून वंचित ठेवणार नसल्याचे राशन दुकानदार‎ कथले यांनी सांगितले. याप्रसंगी 
 वानखेड येथील सरपंच श्रीमती मंगलाताई रंगभाल व उपसरपंच श्री . राजू पाखरे पो. पाटील तसेच श्री . जानराव बापू देशमुख भा . ज पा . उपाध्यक्ष बुलडाणा  गावातील मान्यवर व‎ ग्रामस्थ उपस्थित होते.

    Post Views:  192


मुख्य संपादक
संजय एम. देशमुख




सहसंपादक
सतिश एम.देशमुख


सबंधित बातम्या

सर्व