आम्ही रुग्णसेवक ग्रुप महाराष्ट्र राज्य तर्फे स्व. कौसल्याबाई भांगे यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ विविध कार्यक्रम


 विश्वाप्रभात न्यूज ब्युरो  12 Dec 2022, 1:56 PM
   

आम्ही रुग्णसेवक ग्रुप महाराष्ट्र राज्य चे कोषाध्यक्ष अतुल भांगे यांच्या आजीचा स्मृतिदिन या अनुषंगाने त्यांनी विविध कार्यक्रमाचे आयोजन केले होते या कार्यक्रमात रक्तदान शिबिर आधार कार्ड पॅन कार्ड दुरुस्ती शिबिर आरोग्य तपासणी शिबिर व आभा कार्ड शिबिर आयोजन केले होते रक्तदान शिबिरात ५६ रक्तदात्यांनी रक्तदान केले‌(त्यापैकी 55 पुरुष आणि एक महिला), आधार कार्ड शिबिराचा लाभ ४१ , ई-श्रम कार्ड चा लाभ ८, पॅन कार्ड शिबिराचा लाभ ४, आरोग्य तपासणीचा लाभ ४८ आभा कार्ड चा लाभ ३० येवढ्या नागरिकांनी घेतला
सदरचा कार्यक्रम हा खडकी येथील भांगे मार्केट येथे आयोजित करण्यात आला होता.या कार्यक्रमाला श्री.साहेबरावजी भांगे,श्री गजानन भांगे,श्री विठ्ठलराव भांगे, श्री रामराव भांगे,प्रा.डॉ.संकेत काळे,प्रा.डॉ.रोहित काळे, भावी नगरसेवक पंकज गावंडे,श्री.गणेश अंधारे, वैकुंठ ढोरे, नगरसेविकांत शारदाताई ढोरे, सौ.मालुताई भांगे,सौ‌.नलुबाई भांगे,सौ.शीलाताई भांगे,सौ.वर्षाताई भांगे,प्रा.नवनाथ बडे, संदीप खरड,श्री संदीप शिरसाट (वनरक्षक), देवलाल मेंगे, सुरज अंधारे, नूतन जी (सन्मित्र मानस हॉस्पिटल), सचिन जी, अमोल क्षिरसागर , पाटणकर सर (साई जीवन रक्तपेढी), अमोल नजरधने, रोहित इंगळे,प्रफुल सावने, साई जीवन रक्तपेढी सर्व टीम इ. यांची प्रामुख्याने उपस्थित होते तसेच कार्यक्रमाच्या यशस्वी ते करिता आम्ही रुग्णसेवक ग्रुप महा.राज्य, मित्रपरिवार, मोठे बंधू, गावकरी मंडळी, महिला भजन मंडळी यांनी कार्य केले व कार्यक्रम यशस्वीरित्या पार पडला.

    Post Views:  238


मुख्य संपादक
संजय एम. देशमुख




सहसंपादक
सतिश एम.देशमुख


सबंधित बातम्या

सर्व