गांधीग्रामच्या पुलाचे सोशल ऑडिट करा!... निर्भय बनो ची मागणी


 विश्वप्रभात न्यूज ब्युरो  23 May 2023, 7:36 PM
   

अकोला : अकोला अकोट रोड वरील गांधीग्राम येथे  पर्यायी नवीन बांधलेल्या पुलाची थर्ड पार्टी कडून सोशल एडिट करण्यात यावी अशी मागणी गजानन हरणे समाजसेवक तथा संयोजक निर्भय बनो जन आंदोलन यांनी केली आहे. नुकताच अकोला अकोट रस्त्यावरील गांधीग्राम येथील जुना पूल खराब झाल्यामुळे पर्यायी नवीन पूल बांधण्यात आला आहे. परंतु या पूला विषयी जनतेमध्ये मोठ्या प्रमाणात संभ्रम निर्माण झाला असून मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाल्याचा आरोप जनतेतून चर्चेला जात आहे. कारण या पूलांमध्ये सिमेंटचे 37 पाईप वापरले असून ते व त्याच्या खाली व वर टाकलेले सिमेंट व 400 मीटरचा रस्ता व पुल बांधण्यासाठी चार कोटी रुपये कसे लागले याविषयी मोठ्या प्रमाणात शंका घ्यायला वाव आहे .एक पाईप एक लाखाचा पकडला तरी ३७ लाखाचे पाईप व उर्वरित कामासाठी ६३ लाख असा एकूण एक कोटी मध्ये जास्तीत जास्त हा पूल व्हायला पाहिजे असा अनेक खाजगी इंजिनियर चा सुद्धा दावा आहे. परंतु या पुलावर चार कोटी रुपये खर्च केल्याचा दावा प्रशासकीय यंत्रणे कडून केला जात असल्यामुळे या पुलामधे मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाल्याचा आरोप जनतेमधून होत असताना सुद्धा प्रशासकीय यंत्रणा  गप्प का?. खरोखरच या पूलाच्या बांधकामासाठी चार कोटी खर्च येऊ शकतो का? हा जनतेला पडलेला प्रश्न आहे. त्यामुळे जिल्ह्यातील जनता, नागरिक ,विविध सामाजिक संस्था ,संघटनेचे पदाधिकारी हा पूल पाहिल्यानंतर संभ्रमा अवस्थेमध्ये जातात एवढ्याशा पुलावर चार कोटी खर्च केले तेही एक पूर आल्यानंतर हा पूल वाहतुकीसाठी कामात पडणार नाही आहे. फक्त एका महिन्यासाठी हा पूल बांधला की काय? की पैसे वाटप करण्यासाठी हा पूल बांधला अशी शंका येण्यास मोठी वाव आहे. तरी अशा संभ्रमावस्थेत असलेल्या मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झालेल्या या पुलाचे थर्ड पार्टी सोशल एडिट करून लोकांच्या मनामधील संभ्रम जिल्हा प्रशासनाने दूर करावा या पुलाविषयी अनेक तक्रारी झाल्या तरी त्यावर कोणतीही कारवाई अद्याप पर्यंत झालेली नाही. त्यामुळे पाणी कुठे मुरते या मध्ये जनप्रतिनिधीवर सुद्धा शंका घेतल्या जात असून त्यामधून टक्केवारी खाऊन जनप्रतिनिधी सुद्धा सुस्त झालेले दिसत आहेत. तरी अशा या गांधीग्राम मध्ये पूर्णा नदीवर बांधलेल्या या नवीन पूलाच्या भ्रष्टाचाराची चौकशी करून सोशल एडिट करण्यात यावे अन्यथा जनआंदोलन केल्या जाईल अशा इशारा, मागणी गजानन हरणे समाजसेवक तथा संयोजक निर्भय बनो जण आंदोलन यांनी केली आहे.

    Post Views:  396


मुख्य संपादक
संजय एम. देशमुख




सहसंपादक
सतिश एम.देशमुख


सबंधित बातम्या

सर्व