सुयोग प्रतिष्ठान नानिवली तर्फे गुणगौरव व सत्कार समारंभ संपन्न
विश्वप्रभात न्यूज ब्युरो
01 Aug 2023, 6:10 PM
पालघर- (संतोष घरत)- सुयोग प्रतिष्ठान नानिवली तर्फे आज गुणवंत विद्यार्थी व इतर क्षेत्रांमध्ये उल्लेखनीय कामगिरी केलेल्या सन्माननीय व्यक्तींचा गुणगौरव व सत्कार प्रतिष्ठानचे अध्यक्ष ॲड.उमेश गजानन घरत यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाला.
मागील काही महिन्यापूर्वीच नानिवली गावातील घरतपाडा या ठिकाणी भव्य व दिव्य असे साई मंदिर बांधून मोठ्या जल्लोषात प्राणप्रतिष्ठान सोहळा साजरा करण्यात आला. हे मंदिर स्थापन करण्याकरिता नानिवली गावातील रहिवाशांनी मोठ्या प्रमाणात श्रमदान करून कुठे पैशाची बचत होईल हा उद्देश मनात ठेवून सर्वांनीच हिरीहिरीने भाग घेऊन आपले श्रमदान देऊन हे मंदिर पूर्ण करण्यास सहकार्य केले आहे. ह्या मंदिरासाठी गावकऱ्यांनी जेवढी मेहनत घेतली त्यांच्या मेहनतीला फळ देण्याचे कार्य पालघर जिल्ह्यातील देणगीदार व भाविकांनी आर्थिक मदत करून खूप मोठे मोलाचे असे योगदान दिले आहे. सुयोग प्रतिष्ठान नानिवली तर्फे अनेक उपक्रम राबवले जातात. वृक्षरोपण, आरोग्य शिबिर, हळदी कुंकू कार्यक्रम, गणेशोत्सव ,नवरात्री , गुढीपाडवा ,दिवाळी-होळी,श्रीदत्त जयंती तसेच क्रिकेट स्पर्धा ही आयोजित केल्या जातात. ह्या सर्व स्पर्धा आयोजित करते वेळी सर्वात महत्त्वाचे म्हणजे सर्वांचे मिळालेले श्रमदान व योगदानानेच हे कार्यक्रम आम्ही यशस्वीरित्या पार पाडत असतो असे प्रतिष्ठानचे अध्यक्ष ॲड .उमेश घरत यांनी यावेळेस सांगितले.
Post Views: 166