श्रीमती एल. आर. टी. महाविद्यालयाच्या एन. सी. सी. युनिटने राबविले स्वच्छता अभियान
विश्वप्रभात न्यूज ब्युरो
02 Oct 2023, 7:37 PM
स्थानिक श्रीमती लक्ष्मीबाई राधाकिसन तोष्णीवाल कॉलेज ऑफ कॉमर्स, अकोला च्या एन. सी. सी. युनिटने महात्मा गांधी व लाल बहादूर शास्त्री यांच्या जयंती निमित्त ०२ ऑक्टोबर रोजी महाविद्यालयाच्या परिसरात स्वच्छता हि सेवा हि मोहीम राबविली. ११ महाराष्ट्र बटालियन एन. सी. सी. अकोलाचे कमांडिंग ऑफिसर लेफ्टनंट कर्नल सी. पी. भदोला तसेच एल. आर. टी. कॉलेज ऑफ कॉमर्स अकोलाचे प्राचार्य डॉ. आर. डि. सिकची यांच्या मार्गदर्शनाने ही मोहीम राबविण्यात आली. महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य डॉ. जी. जी. गोंडाणे व एन. सी. सी. ऑफिसर कॅप्टन डॉ. अनिल तिरकर यांच्या उपस्थितीमध्ये या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. सुरुवातीला महाविद्यालयाच्या स्टाफ रूममध्ये महात्मा गांधी व लाल बहादूर शास्त्री यांच्या प्रतिमेला माल्यार्पण करण्यात आले. त्यानंतर एन. सी. सी. कॅडेट्सला मार्गदर्शन करताना डॉ. जी. जी. गोंडाणे म्हणाले स्वच्छ भारत अभियान हे भारत सरकारने सुरू केलेले राष्ट्रीय स्तरावरील अभियान आहे, ज्याचा उद्देश रस्ते आणि पायाभूत सुविधा स्वच्छ ठेवणे हा आहे. एन. सी. सी. विभाग प्रमुख कॅप्टन डॉ. अनिल तिरकर यांनी कॅडेट्सला स्वच्छतेचे महत्त्व समजावून देतांना बोलले की, ०२ ऑक्टोबर महात्मा गांधी व लाल बहादूर शास्त्री यांच्या जयंतीच्या अनुषंगाने एक दिवस आधी ही मोहीम शहरात राबवण्याचे निर्देश शासनाकडून प्राप्त झाले होते. स्वच्छता ही सेवा या अभियानांतर्गत नेहरू पार्क, हुतात्मा स्मारक येथे स्वच्छता मोहीम एन. सी. सी. कॅडेटच्या माध्यमातून राबवण्यात आली. शहरातील परिसरात एक तारीख - एक तास - एक साथ हे राष्ट्रव्यापी अभियान राबवण्यात आले. या दोन्ही महामानवांच्या जयंतीनिमित्त महाविद्यालयातील संपूर्ण परिसर एन. सी. सी. कॅडेट्सनी स्वच्छ केला. या कार्यक्रमाचे आयोजन करण्यासाठी जुनियर अंडर ऑफिसर सागर वानखडे, सार्जंट स्वराज बोधडे, कॉर्पोरल प्रणव इंगोले, कॉर्पोरल श्रीकांत वधोकार, कॅडेट कार्तिक पवार, कॉर्पोरेल आदित्य वाकोडे, कॅडेट यशवंत हरसुलकर, कॅडेट त्रिशब कोकाटे, कॅडेट गुणवंत गुजर, कॅडेट प्रेम अहिर, कॅडेट आदित्य अरुडकार, कॅडेट प्रेम कडस्कर, कॅडेट पवन गिरी, कॅडेट कुणाल खराते, कॅडेट ओम गोदकाळे, कॅडेट प्रवीण सोळंकी, कॅडेट अविनाश वाकोडे, कॅडेट हर्ष देवगिरकर, कॅडेट ओम भारती, कॅडेट शिवम दुबे, कॅडेट रोहन मुरादे, कॅडेट आयुष अंबरकर, कॅडेट अजित वर्मा, कॅडेट स्वप्नील लाहुडकर, कॅडेट निखिल सभादिनंद, कॅडेट सुमित मंगुळकर, कॅडेट यश कमलाकर, जुनियर अंडर ऑफिसर वैष्णवी ढेमरे, कॉर्पोरल धनश्री चव्हाण, सार्जेंट तनाया नाफाडे, कॉर्पोरल नयना टोंगळे, कॉर्पोरल साक्षी गुप्ता, कॅडेट आर्या गंगाखेडकर, कॅडेट सलोनी यादव, कॅडेट पूर्वा देवगरे, कॅडेट साक्षी जटाले, कॅडेट लीना काळे व इतर कॅडेट्सनी बरीच मेहनत घेतली. या कार्यक्रमाचे आयोजन व नियोजन केल्याबद्दल दि बेरार जनरल एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष ॲड. मोतीसिंहजी मोहता, वरिष्ठ उपाध्यक्ष विजयकुमार तोष्णीवाल, उपाध्यक्ष इंजि. अभिजितजी परांजपे, मानद सचिव श्री. पवनजी माहेश्वरी, सह सचिव सी. ए. विक्रमजी गोलेच्छा व समस्त माननीय कार्यकारी सदस्यांनी सुद्धा शुभेच्छा देऊन कॅडेट्सचा आत्मविश्वास वाढविला.
Post Views: 143