आयुष्यात सकारात्मकता शिकविणार रामायण-डॉ. भूषण फडके


बाजावो ढोल स्वगातके मेरे घर राम आये है गीतावर भाविकांनी धरला ठेका; निलेश देव मित्र मंडळाचा उपक्रम
 विश्वाप्रभात न्यूज ब्युरो  10 Apr 2024, 10:49 AM
   

अकोला- भारतीय संस्कृतीत श्रीरामचंद्र वंदनीय, स्फूर्तीदायक आणि अनुकरणीय आहेत. गुढीपाडव्यापासून श्रीरामाचे नवरात्र स्थापन होते. याचेच औचित्य साधून बिर्ला मंदिर जठारपेठ येथे डॉ. भूषण फडके यांच्या संगीत श्रीरामकथा या कार्यक्रमाचे आयोजन निलेश देव मित्र मंडळाने केले होते. आयुष्यात श्रीरामायण साकारात्मकता शिकवित असते असे प्रतिपादन डॉ.फडके यांनी केले.
  डॉ. फडके पुढे म्हणाले, प्रभू रामाचे चरित्र आदर्शाच्या हिमालयावर आणि त्यागाच्या मेरूपर्वतावर उभे आहे. या चरित्राची व्याप्ती क्षितिजासारखी अमर्याद आहे. भक्तीमार्गाहून मुक्तीमार्गाची ओढ लागलेल्या फक्त वृद्धांसाठी रामायण आहे, असा गैरसमज कोणीही करू नये. संस्कारक्षम वयात योग्य संस्कारासाठी, व्यवस्थापनाचे धडे गिरविणाऱ्यांसाठी, सामाजिक ऐक्य एकोपा कसा वृद्धिंगत करावे हे समजण्यासाठी, सर्वांसाठी श्रीरामायण उपयुक्त आहे. निलेश देव मित्र मंडळाच्या आयोजनामुळे श्रीराम चरित्राच्या अमृत कुंभातील अमृताचे रसपान करण्याची संधी माझ्यासह सर्व भाविकांना मिळते आहे. यासाठी निलेश देव कौतुकास आणि अभिनंदनास पात्र आहेत.
  यावेळी श्री रामायांतील बालकाण्ड चे निरुपण करण्यात आले. यात वाल्मिकिंकडून रामचरित्र लेखनास प्रारंभ, लव कुशाकडून अयोध्येमध्ये रामचरित्र गायन, अयोध्यानगरीचे वर्णन श्रावण कुमारच्या मातापित्य्कडून मिळालेले शाप, , पुत्रकामेष्टी यज्ञ, श्रीराम जन्म, त्राटीका वध या घटनांची मांडणी करण्यात आली. वशिष्ठ ऋषींच्या उदाहरणातून सकारात्मकता आणि एखादा शाप वरदान कसा होऊ शकतो याचे सुंदर निरुपण करण्यात आले. त्रिकालदृष्टीचे महाकवी वाल्मिकी ऋषींनी अनेक जीवनमुल्यांची शिकवण रामायणातून दिली आहे.असे प्रतिपादन डॉ.फडके यांनी केले. त्राटीका वाधावर बोलताना डॉ. फडके म्हणाले स्त्री म्हणून या राक्षसीणीस कसे मारावे? असा प्रश्न श्रीरामास पडतो. पण ही राक्षसिण नीतिभ्रष्ट आहे. एखाद्या चांगल्या कामात संकटे येतातच. त्राटका  असेच संकट आहे. असे संकट समूळ नष्ट केल्याशिवाय ध्येयापर्यंत पोहचू शकत नाही. राष्ट्ररक्षण हे श्रीरामाचे ध्येय आहे. त्या ध्येयाच्या मार्गात येणाऱ्या अडचणी दूर करणे क्रमप्राप्त आहे. म्हणून विश्वामित्र रामास त्राटीकारुपी संकटाला दूर करण्याचा म्हणजेच तिचा वध करण्याची आज्ञा देतात. योग्य मार्गदर्शन करून कार्यपूर्ती कशी करावी याचा योग्य वस्तुपाठ विश्वामित्र ऋषींनी दाखवून दिले आहे. विश्वामित्रांच्या आदेशानंतर श्रीराम त्रातीकेचा वध करतात. कार्यक्रमात सामोयोचीत गीते सदर करण्यात आली. देवाशिष फडके याने कुश लाव रामायण गाती, राम जन्माला ग सखी,जेष्ठ  तुझा पुत्र मला देई दशरथा, चला राघवा चला तर निखिल देशमुख यांनी अयोध्या मनुनिर्मित नागरी, दशरथा घे हे पायसदान, वैशाली फडके यांनी सावळा ग रामचंद्र, तूच सूर ठावा मजसी हि गीते सादर केलीत. देवाशिष फडके याने बाजावो ढोल स्वगातके मेरे घर राम आये है हे गीत सदर केले तेव्हा भाविकांनी उस्फुर्त दाद दिली. हार्दिक दुबे आणि सूमत तरालकर यांनी साथ सांगत केली. कु.नारायणी शास्त्री आणि चि.सार्थक देव यांनी कार्यक्रमाचे समयोचित आणि प्रभावशाली संचालन केले. जयंतराव सरदेशपांडे, प्रकाश जोशी, अजय शास्त्री, शैलेश देव, रश्मीताई देव , राजेंद्र गुणलवार, भास्कर राव बैतवार,महेश बिहाडे,रामभाऊ उमरेकर,विजय वाघ, नरेंद्र परदेशी, सोनु मोटे, निलेश पवार, प्रसाद देशपांडे, मुकुंदराव देशपांडे, प्रशांत पांडे,रमापत्ती यादव,मारवाल,रमेश खिलोसिय्या,संजय देशमुख, मनिष अभ्यंकर,बबलु तिवारी,ललन मिश्रा सह अनेकयांच्या हस्ते आरती करण्यात आली. निलेश देव मित्र मंडळाच्या आयोजनाने रसिक भक्तिरसात न्हाऊन निघालेत. कार्यक्रमाला भाविकांची प्रचंड उपस्थिती होती.

    Post Views:  226


मुख्य संपादक
संजय एम. देशमुख




सहसंपादक
सतिश एम.देशमुख


सबंधित बातम्या

सर्व