गरजू लाभार्थांना घरकुल योजना पासून वंचित ठेवणार्या सरपंच सचिव वर कारवाई करा


गावकरी मंडळींनी दिले मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना निवेदन
 विश्वाप्रभात न्यूज ब्युरो  09 May 2024, 1:30 PM
   

कापशी : गरजूंना घरकुल योजनेचा वासून वंचित ठेवणाऱ्या सरपंच सचिवार कारवाई करून गरजूंना घरकुलचे लाभ मिळवून देणे बाबत कापशी रोड येथील लाभार्थांनी मुख्यकार्यकारी यांनी दिलेल्या निवेदन म्हटले आहे निवेदनात आमच्या आजोबापासून जन्मापासून आम्ही येथे रहिवासी आहोत पण आजपर्यंत ही घरकुलाचा लाभ मिळाला नाही घरकुल लाभापासुन वंचीत ठेवणार्या   सरपंच सचिव यांच्यावर योग्य ते कारवाई करून आम्हाला घरकुल योजनेचा लाभ मिळवून देण्यात यावा असे गावकऱ्यांनी मुख्य कार्यकारी अधिकारी यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे माननीय मुख्यकार्य अधिकारी आपणास स्वतः आमच्या घराची पाहणी करून खरोखर गरजू व लाभार्थ्यांना घरकुलचा लाभ मिळून देण्यात यावा आमच्या घर आजही कुळामाती चे व वरुन कौल व मेणकापड टाकलेला आहे असे असतांनाही   कापशी रोड गावाचे सरपंच सचिव यांच्या मनमानी कारभाराने गरजू लाभार्थी सोडून धन धागळया  व ज्यांच्या घरी पक्के बांधकाम आहे हे तश्यांना घरकुलाचा लाभ त्यांच्या स्वतःच्या स्वार्थासाठी गोरगरिबांना नुकसान करत आहेत असे असताना सुद्धा सरपंच सचिव हे आम्हाला घरकुलचा लाभ न देता श्रीमंतांना लाभ देण्यात धन्यता मानते त्यामुळे आपणाकडे निवेदन   करून आम्हाला घरकुल योजना लाभ मिळवून द्यावा व सरपंच सचिव यांच्या मनमानी कारभाराला आडा घालून कारवाई करण्यात यावा  सरस्वती हरिलाल केवट ,संदीप शिवचरण केवट,  नंदलाल राजाराम केवट,  रामहरण रामचरण केवट, मनोहर केवट रामकरण मनोहर केवट,  कमलाबाई सिताराम केवट, रामप्रसाद राजाराम केवट , नंदाबाई वैजनाथ यादव, शकुंतला जोखन यादव, जगदीश रामजोर यादव, मिठूलाल रामनरेश पाली, गोपाल रामपाल यादव अमोल मुनीलाल केवट अमर  अमृतलाल  केवट, गजानन रामपाल यादव, आदींनी निवेदन सादर केले आहे

    Post Views:  187


मुख्य संपादक
संजय एम. देशमुख




सहसंपादक
सतिश एम.देशमुख


सबंधित बातम्या

सर्व