जिजाऊ सभागृहाचे काम 12 जानेवारी पर्यंत पूर्ण करा


वंचित बहुजन आघाडीचे संघटक निलेश देव यांची मागणी
 विश्वाप्रभात न्यूज ब्युरो  10 Dec 2024, 9:21 AM
   

अकोला- स्थानिक रेल्वे स्थानक मार्गावर राजमाता जिजाऊ यांच्या नावाने असलेल्या शहरातील एकमेव सभागृहाचे काम गेल्या वर्षभरापासून सुरू आहे, ते अद्यापही पूर्ण झालेले नाही. त्यामुळे राजमाता जिजाऊ यांच्या जयंती पर्यंत म्हणजे येत्या 12 जानेवारी पर्यंत हे काम पूर्ण करावे अशी मागणी वंचित बहुजन आघाडीचे संघटक निलेश देव यांनी केली आहे.
        रेल्वे स्थानक मार्गावरील न्यायालयासमोर असलेल्या जिजाऊ सभागृहाची अवस्था अत्यंत वाईट झाली होती. सभागृहाच्या दुरावस्थेमुळे हे सभागृह वापरण्यायोग्य राहिले नव्हते. तेव्हा वंचित बहुजन आघाडीच्या वतीने विविध लक्षवेधी आंदोलने करून या सभागृहाच्या नूतनीकरणासाठी शासन व प्रशासनाचे लक्ष वेधण्यात आले. वंचितच्या लक्षवेधी आंदोलनानंतर प्रशासनाकडून जिजाऊ सभागृहाच्या नूतनीकरण व सौंदर्यीकरणासाठी निधी मंजूर करण्यात आला. त्यानंतर वंचितचे राष्ट्रीय नेते ॲड. बाळासाहेब आंबेडकर यांच्या हस्ते या नूतनीकरण कामाचा शुभारंभ करण्यात आला. नूतनीकरणाच्या कामामध्ये कोणतीही हलगर्जी होऊ नये, चांगल्या पद्धतीने व दर्जेदार काम व्हावे यासाठी वंचितच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांकडून या नूतनीकरण व सौंदर्यीकरण कामावर लक्ष ठेवल्या जात आहे. परंतु वर्ष होत आले तरी अद्यापही हे काम पूर्ण झालेले नाही. त्यामुळे राजमाता जिजाऊ यांच्या जयंती पर्यंत म्हणजे येत्या 12 जानेवारी पर्यंत हे काम पूर्ण करण्यात यावे अशी मागणी निलेश देव यांनी केली आहे.

    Post Views:  152


मुख्य संपादक
संजय एम. देशमुख




सहसंपादक
सतिश एम.देशमुख


सबंधित बातम्या

सर्व