लसीकरण जनजागृती केल्याबद्दल जि .प .प्रा.शाळा नकाशि विद्यार्थी प्रशिक सदार याचा गौरव
कोविड लसीकरण मोहिमेअंतर्गत जनजागृती करून लोकांना लसीकरणाचा प्रवृत्त केल्याबद्दल बुधवार दिनांक 8/ 12 /2021 ला विशेष कार्यक्रमात जि.प .शाळा नकाशि.पंचायत समिती बाळापूर.येथील विद्यार्थी प्रशिक निशिकांत सदार यास माननीय जिल्हाधिकारी निमा अरोरा व जि.प.चे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री सौरभ कटियार यांचे हस्ते शिक्षणाधिकारी डॉ.वैशाली ठग (प्राथमिक) जिल्हा लसीकरण समन्वयक अधिकारी डॉ.मनिष शर्मा व उपशिक्षणाधिकारी श्री दिलीप तायडे यांच्या उपस्थितीत प्रमाणपत्र देण्यात आले ..हे गौरव प्रमाणपत्र स्वीकारण्यासाठी त्याचे वडील निशिकांत सदार व शाळेचे विषय शिक्षक श्री सुभाष कळंब सर. हिम्मत सदार उपस्थित होते.तसेच बाळापुर प.स .चे गटशिक्षणाधिकारी श्री बडवे साहेब श्री विस्तार अधिकारी बाडी साहेब व देगाव केंद्रप्रमुख श्री मन सागर वानखडे साहेब व शाळेच्या मुख्याध्यापिका सौ विमल डोंगरे उपस्थित होते! लसीकरणात प्रवृत्त करण्यासाठी शाळेचे सर्व शिक्षक, अंगणवाडी सेविका, मदतनीस व आशा वर्कर यांचे सहकार्य लाभले.
Post Views: 321