पहिले बोलीभाषा साहित्य संमेलन २०२६ च्या अध्यक्षपदी आबासाहेब कडू यांची निवड
विश्वाप्रभात न्यूज ब्युरो
11 Sep 2026, 9:42 AM
बोलीभाषा साहित्य संस्था अकोला द्वारा संचालित 'बोलीभाषा साहित्य, संशोधन आणि संवर्धन परिषद' च्या वतीने "पहिले बोलीभाषा साहित्य संमेलन २०२६" चे आयोजन करण्यात आले आहे. हे संमेलन २२ नोव्हेंबर २०२६ रोजी अमरावती येथे संपन्न होणार आहे. महाराष्ट्रातील सर्व बोलीभाषांना एका मांडवाखाली आण्याचा हा ऐतिहासिक प्रयोग आहे. या ऐतिहासिक संमेलनाच्या अध्यक्षपदी वऱ्हाडी भाषेचे सुप्रसिद्ध साहित्यीक मा.आबासाहेब कडू (अमरावती) यांची निवड करण्यात आली आहे. अशी माहिती बोलीभाषा परिषदेचे अध्यक्ष प्रा.महादेव लुले (देवबाबु) यांनी दिली.
या संमेलनात आगरी बोली, वऱ्हाडी बोली, अहीरणी बोली, बंजार बोली, लेवागण बोली, झाडीबोली सोलापुरी बोली, अशा सर्व साहित्यीकांनी सहभागी होण्याचे आवाहन पुष्पराज गावंडे, प्रमोद काकडे, डॉ. ममता इंगोले, संजय देशमुख, प्रा.सदाशिव शेळके, दिवाकर देशमुख, डॉ. स्वप्नील मानकर प्रा महादेव लुले यांच्यासह बोलीभाषा साहित्य संशोधन आणि संवर्धन परिषद चे संचालक मंडळ व सचिव युवराज टोपले, कोषाध्यक्ष उज्वलाताई कांबळे, प्रसिद्धी प्रमुख सागर लाहोळकार, संघटक किशोर बुजाडे आणि सदस्य पवन वसे, दिनेश मोहरील यांनी केले आहे.
Post Views: 35