मूर्तिजापूर : मूर्तिजापूर तालुक्यातील बोरगाव मंजू पोलीस स्टेशन अंतर्गत येत असलेल्या गोरेगावच्या युवा शेतकऱ्याने कर्ज व नापिकीला कंटाळून आपली जीवनयात्रा संपविण्याची घटना मंगळवारी संध्याकाळी घडली. नितीन भिमराव सोनोने (३७) असे आत्महत्या केलेल्या शेतकऱ्याचे नाव आहे.
३७ वर्षीय नितिन सोनोने या शेतकऱ्याच्या नावे ८ एकर कोरडवाहू शेती आहे. शेतीवर बँकेचे कर्ज आहे. सततची नापिकी आणि डोक्यावरील कर्जाच्या डोंगराला कंटाळून आत्महत्या केल्याची माहिती आहे. नितीन यांनी आपल्या घरातच गळफास घेऊन १८ जानेवारी रोजी रात्री आत्महत्या केली. बुधवारी सकाळी हा प्रकार लक्षात आला. वयोवृद्ध आई-वडील, पत्नी, एक मुलगी व एक केवळ १३ महिन्यांचा मुलगा असा परिवार या शेतकऱ्याच्या आत्महत्येमुळे पोरका झाला आहे. अलिकडे तो नापिकी व कर्जामुळे ते चिंतित असल्याचे समजते.
Post Views: 341
सर्व
सर्व
admin@sanjay
admin@Sanjay