हभप निवृत्ती महाराज इंदुरीकर यांचे सामाजिक प्रबोधन


मान्यवरांच्या हस्ते भूमिपूजन सोहळा; आदिशक्ती मुक्ताई मंडळाचा उपक्रम
 पंकज देशमुख  28 Feb 2022, 8:18 PM
   

अकोला : प्रसिध्द समाज प्रबोधनकार विनोदाचार्य हभप निवृत्ती महाराज इंदुरीकर यांचे अकोल्यात 7 मार्च रोजी भव्य किर्तन सोहळ्याचे आयोजन आदिशक्ती मुक्ताई मंडळाच्या वतीने करण्यात आले. या कार्यक्रमाच्या सोहळ्याचे कौलखेड येथे भूमिपूजन करण्यात आले. 
 कौलखेड येथील आदिशक्ती मुक्ताई मंडळाचा गेल्या तीस वर्षापासून अखंडपणे किर्तन सोहळ्याचे आयोजन करते. मात्र, कोरोनाच्या संकटामुळे दोन वर्षापासून त्यात खंड पडला होता. यंदा आता महाराष्ट्रातील ख्यातनाम किर्तन व समाज प्रबोधनकार हभप निवृत्ती महाराज इंदुरीकर यांच्या हरिकिर्तनाचा कार्यक्रम सोमवार, ७ मार्च रोजी दुर्गा लॉनच्या बाजूला, एसटी वक्र्सशॉपच्या समोर, प्रभाग क्र.२९ कौलखेड,अकोला येथे आयोजित करण्यात आला आहे. या भूमिपूजन सोहळ्याच्या व्यासपीठावर माजी राज्यमंत्री गुलाबराव गावंडे, आ. अमोल मिटकरी, हभप नानासाहेब उजवणे, आदिशक्ती मुक्ताई मंडळाचे अध्यक्ष बाळाभाऊ गावंडे, हभप मनोहर महाराज डुकरे, हभप वासुदेवराव महल्ले, सचिव साहेबराव वहिले,श्रीकांत पिसे, हरीभाऊ भालतिलक,बादलसिंग ठाकूर उपस्थित होते. यावेळी मान्यवरांचे स्वागत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे जिल्हाअध्यक्ष तथा कीर्तन महोत्सवाचे स्वागताध्यक्ष संग्राम गावंडे यांनी केले. या वेळी संचालन खानजोडे सर यांनी तसेच प्रास्ताविक हभप मनोहर महाराज डुकरे यांनी केले. तर आभार प्रदर्शन माजी नगरसेवक पंकज गावंडे यांनी मानले.
महिला दिनानिमित्त खेळ पैठणीचा कार्यक्रम
मंगळवार, ८ मार्च रोजी जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून पुणे येथील कॉमेडिचा बादशाह, अभिनेता सुभाष यादव यांचा खळखळून हसविणारा कॉमेडिचा भन्नाट कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. याशिवाय विविध क्षेत्रातील कर्तबगार महिला भगिणींचा गौरव करण्यात येत आहे.

    Post Views:  485


मुख्य संपादक
संजय एम. देशमुख




सहसंपादक
सतिश एम.देशमुख


सबंधित बातम्या

सर्व