पाटील समाज अकोला च्या अध्यक्षपदी अशोकराव अमानकर तर सचिव पदी प्रदीप खाडे
कार्याध्यक्षपदी सुरेश गाढे तर उपाध्यक्षपदी अविनाश नाकट व संदीप महल्ले
विश्वाप्रभात न्यूज ब्युरो
13 Apr 2026, 8:16 AM
पाटील समाजाची नूतन कार्यकारिणी घोषित
अकोला - पाटील समाज अकोला ची नूतन कार्यकारिणी घोषित करण्यात आली आहे. यात अध्यक्षपदावर अशोकराव अमानकर तर सचिव पदी प्रदीप खाडे यांची निवड करण्यात आली आहे. समाजाचे अध्यक्ष अशोकराव अमानकर, कार्याध्यक्ष सुनील जानोरकर यांच्या व इतरही सदस्यांच्या उपस्थितीत संपन्न झालेल्या एका सभेत ही नूतन कार्यकारिणी जाहीर करण्यात आली. या कार्यकारिणीत पुढील प्रमाणे इतर पदाधिकारी नियुक्त करण्यात आले आहेत.
कार्याध्यक्ष पदावर सुरेश गाढे पाटील यांची तर उपाध्यक्ष पदावर अविनाश नाकट व संदीप महल्ले पाटील यांची निवड करण्यात आली आहे. कोषाध्यक्षपदी विजय बोरकर तर सहसचिव पदावर संजय लुंगे यांची वर्णी लावण्यात आली आहे. महिला प्रतिनिधी म्हणून सरिता वाकोडे, प्रा. डॉ. ममता इंगोले, ऍड. दिपाली जानोरकर व रेखा राऊत यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
सदस्य पदावर अविनाश पाटील, डॉ. दिलीप मानकर, प्रकाश चतरकर, निलेश पवित्रकार, गजानन इंगळे, संजय मालोकार, पंकज जायले, वसंतराव घनोकार, विक्रम जानोरकर, ऍड. संतोष गावंडे, हर्षल भांबेरे, श्याम कुलट, शरद पांडे, सुधाकर वानखडे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. समाजातील ज्येष्ठ व्यक्ती विनायकराव शेळके, राजेंद्र मोहोकार, दिनकरराव सरप, सुभाषराव म्हैसणे, विनायकराव गावंडे, वासुदेवराव कडू, देवराव पाटील हागे, प्रा. दत्तात्रय भाकरे हे कार्यकारीनीत मार्गदर्शक म्हणून कार्यकारिणीस मार्गदर्शन करतील.
पाटील समाजाची ही कार्यकारिणी वधु वर परिचय मेळावे घेण्यासोबतच तालुकास्तरीय कार्यकारिण्या तयार करून त्या तालुक्यात समाज सक्रिय व बळकट करणे, बेरोजगार युवकांसाठी रोजगार मार्गदर्शन मेळावे आयोजित करणे, गावोगावी आरोग्य तपासणी शिबिरांचे आयोजन, समाजातील गरीब व होतकरू विद्यार्थ्यांना शैक्षणिक कामासाठी मदत करणे, महिलांचे विशेष मेळावे आयोजित करून त्यांना मार्गदर्शन करणे, समाजातील मुला मुलींच्या संसारात काही अडचण निर्माण झाल्यास त्यांना मोफत कायदेशीर सल्ला देणे आदी समाजोपयोगी कार्यांवर भर देणार आहे. असे नवनियुक्त अध्यक्ष अशोकराव अमानकर यांनी या सभेत आपले मनोगत व्यक्त करताना जाहीर केले. सभेचे संचालन व आभार प्रदर्शन सचिव प्रदीप खाडे यांनी केले.
Post Views: 32